डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेटची १२ वी वार्षीक सभा पडली पार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेटची १२ वी वार्षीक सभा पडली पार

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीची १२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा डॉ आंबेडकर कारखाना कार्यस्थळावर दि.२७ सप्टेंबर रोजी पार पडली.

सभेच्या सुरवातीस चेअरमन ऍड. चित्राव गोरे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत करुन अहवाल सालातील दिवंगताना श्रध्दांजली वाहून सभेच्या कामकाजास सुरवात झाली. विषय पत्रिकेवरील विषयानुसार सभेत वाचल्यानंतर त्यास सभासदांनी एकमताने मान्यता दिली. सभेचे कामकाज संपल्यानंतर ऍड. गोरे यांनी केंद्र शासनाने मल्टीस्टेटे कायद्यात केलेले बदल सांगून आपल्या संस्थेच्या कामकाजात येणाऱ्या अमुलाग्र बदलाची माहीती सभेस देवून नवीन कायद्यातील दुरुस्त्यानुसार संस्थेच्या कामकाजास आपले यापुढेही असेच सहकार्य रहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानंतर संस्थेशी सलग्न संस्था हिंगळजाई प्रोडयूसर कंपनीच्या ६ व्या वार्षिक सभेच्या अनुषंगाने संस्थेमार्फत चालविण्यात येत असलेल्या चिखली व उजनी येथील सोयाबीन खरेदी केंद्रावरील कामकाजाचे व संस्थेच्या तळेबंदाचे वाचन केले. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरविंद गोरे यांनी कारखाना, मल्टीस्टेट, हिंगलजाई प्रोड्यूसर कंपनी व राजर्षी शाहू पंतसंस्था यांच्या समन्वयातून कामकाज करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्थकारणास बळकटी देण्यात येत असल्याचे सांगितले. या सर्व संस्थानी यापुढेही असेच शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्य करावे. तसेच यापुढेही सर्व संस्थाच्या सभासदांनी सहकार्याने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक युवराज राजेनिंबाळकर यांनी मानले. यावेळी महिला सभासद, हितचिंतक, कारखान्याचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !