अल्पसंख्यांक शिक्षक, कर्मचारी पतसंस्थेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर
अल्पसंख्यांक शिक्षक, कर्मचारी पतसंस्थेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - अल्पसंख्यांक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाचे स्वमालकीच्या जागेतील कार्यालयाचे लोकार्पण आ राणाजगजिसिंह पाटील यांच्या हस्ते दि.२४ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
धाराशिव शहरातील जिल्हा परिषदच्या पाठीमागील भाग्यनगर येथे पतसंस्थेचे कार्यालय उभारण्यात आले आहे. यावेळी आ पाटील यांनी संचालक मंडळाचे कौतुक करून शुभेच्या देत आगामी काळात पतसंस्थेला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शिक्षण क्षेत्राला उभारी देण्यासाठी सर्व शिक्षकांना प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे संस्थापक चेअरमन बशीर तांबोळी यांनी तर सूत्रसंचालन बालाजी इतबारे यांनी व आभार संचालक खिजर मोरवे यांनी मानले. यावेळी संचालक मालोजी वाघमारे, बिलाल सौदागर, बागवान इलाही, रहीम तांबोळी, खिजर मोरवे, मारुती काळे, मुबारक पठाण, मुमताज शेख, तब्बसुम बागबान, शहेनाज औसेकर, शहेदबी शेख, आनिशा कदम, कल्याण बेताले, बाळासाहेब वाघमारे, सुरेश भालेराव, अहमद सय्यद, नागनाथ देशमुख, बाबुराव कोकाटे, अंकुश गवळी, रामदास होरे, बालाजी तांबे, इस्माईल शेख, विशाल सुर्यवंशी, राजकुमार मेंढेकर, बाळासाहेब चिवडे, दत्ता बामनिकर, धर्माधिकारी, बोडखे, खरोद्दिन सय्यद, निजाम सय्यद, खलील सय्यद, माळी, बब्रु भोसले, मिलिंद जानराव, विनोद जानराव यांच्यासह सभासद उपस्थित होते.