नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ धूर फवारणी करण्याची शिवसेना (ठाकरे) ची मागणी

नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे डेंग्यू सदृश रुग्णांच्या संख्येत वाढ

धूर फवारणी करण्याची शिवसेना (ठाकरे) ची मागणी

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. परिणामी डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी यामध्ये स्वतः लक्ष देऊन नागरी समस्यांची सोडवणूक करण्याबाबत नगर परिषद प्रशासनाला अवगत करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना (ठाकरे) च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,  धाराशिव शहरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू सदृश आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. नगर पालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. २-२ महिने नाल्याची सफाई केली जात नाही. कचरा उचलण्यासाठी घंटागाडी वेळेवर येत नाही. परिणामी घाणीमुळे डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात होऊन डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या वाढत आहे. तर नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात जंतुनाशक औषध व धूर फवारणी करणे गरजेचे आहे. तसेच ऐन सणासुदीच्या दिवसात पथदिवे बंद असल्यामुळे शहरात रात्री काळोखाचे साम्राज्य आहे. पथदिवे चालू अथवा बंद करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने कर्मचारी नेमावेत, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव, राजाभाऊ पवार, प्रदीप घोणे, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, अक्षय ढोबळे, राणा बनसोडे, नितीन शेरखाने, गणेश असलेकर, गणेश खोचरे, रवी वाघमारे, पंकज पाटील, बंडू आदरकर, सिद्धेश्वर कोळी, विजय ढोणे, पांडुरंग भोसले, नाना घाटगे, अजिंक्य राजेनिंबाळकर, अफरोज पीरजादे, मुजीब काझी, साबेर सय्यद, नंदू माने, राम साळुंके, गणेश साळुंके, रुपेश शेटे, महेश लिमये, सह्याद्री राजेनिंबाळकर, हर्षद ठवरे, अजित बाकले, निलेश साळुंके, यशवंत शहापालक, केदार साळुंके, बाळासाहेब वरुडकर, उमाकांत कसबे, निलेश शिंदे, राकेश सूर्यवंशी, आरिफ तांबोळी, गफूर शेख, बाबू पडवळ, सुनील वाघ, नरसिंह आंबेकर, अमित उंबरे, मनोज उंबरे आदींच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !