शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास नॅकचा बी ++ ग्रेड

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास नॅकचा बी ++ ग्रेड

कळंब दि.१६ (प्रतिनिधी) - ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक) बंगलोरच्या तज्ज्ञ समितीने २८ व २९ ऑगस्ट रोजी भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये आजी आणि विद्यार्थी-पालक- पत्रकार यांच्या संयुक्त बैठकीत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अभ्यासक्रमाबरोबरच भौतिक सोई-सुविधा, ग्रंथालय, अभ्यासिका, उपक्रम राबविले जातात, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना तसेच विज्ञान शाखेतील विविध विभागांना भेट देऊन तेथील उपकरण, प्रयोगशाळा यांची तपासणी केली होती.
या पाहणीनंतर नॅकने नुकतेच गुणांकन जाहीर केले.  त्यात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयास बी ++ ग्रेड सह २.७७ गुण मिळाले आहेत. तृतीय सायकलमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाने ही श्रेणी प्राप्त केली आहे. या विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकुल, उपाध्यक्ष प्रा.डॉ.अंकुश पाटील, सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांनी प्राचार्य डॉ.सुनील पवार, उपप्राचार्य डॉ. सतीश लोमटे, डॉ.हेमंत भगवान, डॉ. के.डी. जाधव, डॉ. संजय कांबळे, प्रो.दादाराव गुंडरे , प्रा.डॉ. दीपक सुर्यवंशी, डॉ. आर.व्ही. ताटीपामुल, प्रा.डॉ. खोब्राजी पावडे, प्रा.डॉ.डी.एस. साकोळे, डॉ.एन.एम. अंकुशराव, प्रा.डॉ.एन.जी.साठे, डॉ.ई.एल. राठोड, डॉ.डी.एन. चिंते,प्रा.ए.आर. मुखेडकर, प्र. डॉ.जयवंत ढोले, डॉ.मीनाक्षी जाधव,डॉ. पल्लवी उंदरे, डॉ.संदीप महाजन, श्रीकांत भोसले, डॉ.विश्वजीत म्हस्के, प्रा.डॉ.एन.एम अदाटे, प्रा.डॉ.संजय सावंत, प्रा.अनिल फाटक, अरविंद शिंदे, हनुमंत जाधव, प्रकाश गायकवाड, नेताजी देशमुख, अरुण मुंडे, विनोद खरात, संतोष मोरे, रमेश भालेकर, अर्जुन वाघमारे, चांगदेव खंदारे, आदित्य मडके, संदिप सुर्यवंशी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यानी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !