रोटरी क्लब उस्मानाबादचा प्रकल्प निर्मल
रोटरी क्लब उस्मानाबादचा प्रकल्प निर्मल
धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - रोटरी क्लब उस्मानाबाद, धारासूर मर्दिनी महिला फेडरेशन व व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात प्रकल्प निर्मल राबविण्यात आला.
धाराशिव शहरातील १० गणेश मंडळांच्या देखाव्यांजवळ मोठे ड्रम ठेवून त्यात निर्माल्याचे दर ३ दिवसांनी संकलन करून व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आले.
प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिक वापरासंबंधी माहिती देणारे बॅनर लावण्यात आले. या प्रकल्पासाठी रोटरी क्लबच्या अध्यक्ष डॉ अनार साळुंके,सचिव डॉ मीना जिंतूरकर, प्रकल्प प्रमुख रो. सुधाकर भोसले, सुरज कदम, रणजित रणदिवे, अभिजित पवार, संतोष शेटे, बाळासाहेब देशमुख, प्रविण काळे, संजय देशमाने, उदय तीर्थकर, धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनच्या अध्यक्ष डॉ रेखा ढगे, नीता कठारे, मेधा कुलकर्णी, विनीता कुलकर्णी, अनुराधा तोडकरी, प्राचार्य डॉ प्रशांत चौधरी, वनस्पती शास्त्र विभागाचे प्रा अभय शिंदे, पप्पू यादव यांचा विशेष सहभाग होता.
शहर स्वच्छता व पर्यावरण पूरक असा हा उपक्रम होता. यातून एक टन निर्माल्याचे संकलन करण्यात आले.