स्त्री जन्माचे स्वागत व सन्मान करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य - हभप नन्नवरे
स्त्री जन्माचे स्वागत व सन्मान करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य - हभप नन्नवरे
धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कारण आजची स्त्री उद्याचा आधुनिक देश घडविणारी विशाल स्त्रीशक्ती असून स्त्री जन्माचे स्वागत व सन्मान करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य असल्याचे मत हभप छायाताई शरद नन्नवरे यांनी आपल्या भजनातून व्यक्त केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगाव येथे हभप नन्नवरे यांनी संगीत भजनद्वारे नागरिकांना स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी बेटी बचाओची जनजागृती करताना त्या बोलत होत्या. त्यांनी आपल्या भजनाद्वारे वेगवेगळे संदर्भ देत स्त्रीचे महत्त्व विशद तर केलेच. शिवाय स्त्री ही जगाची जननी असल्याचे सांगत स्त्रीचा आदर म्हणजेच स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा पर्यायाने देशाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सरपंच आप्पासाहेब धनके, महादेव शिंदे, नागनाथ गुंड, आप्पा शिंदे, सुनील शिंदे आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.