डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास संरक्षण कठडे बसविण्यासाठी धरणे आंदोलन
डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्यास संरक्षण कठडे बसविण्यासाठी धरणे आंदोलन
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे पुतळा चबुऱ्यास असलेल्या फरशा निखळलेल्या आहेत. त्यामुळे या पुतळ्याला संरक्षण दगड बसविण्यासह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.१५ सप्टेंबर रोजी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
धाराशिव शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास एका अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे पुतळा चबुऱ्यास धक्का बसला आहे. तर चबुऱ्यास बसविलेल्या फरशा निखळलेल्या आहेत. याची माहिती नगर परिषद व जिल्हा प्रशासनाला वारंवार दिली. त्यानंतर नगर परिषदेच्यावतीने फक्त फरशा बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र अतिशय महत्त्वाचे संरक्षक कठडे म्हणून दगड बसविण्यासह इतर कामे करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही नगर परिषदेच्या गाढव कारभारामुळे ती कामे करण्यासाठी चालढकल केली जात आहे. त्यामुळे हे लक्षणे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ऍड.प्रबुद्ध कांबळे, भारतीय बौद्ध महासभेचे विजय बनसोडे तालुकाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, विद्यानंद वाघमारे,तालुका संस्कार सचिव अजिनाथ सरवदे, कार्यालयीन सचिव महादेव एडके, तालुका पर्यटन सचिव धनंजय वाघमारे, संरक्षण सचिव सचिन दिलपाक, बाबासाहेब कांबळे, संघटक अमोल अंकुशराव, संघटक बापू जावळे, बालाजी जावळे, रमेश कांबळे, बापू कुचेकर, मुकेश मोठे, युवराज पौळ, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव बाबासाहेब जानराव, रघुनाथ गायकवाड रघुनाथ, जिल्हा सचिव युनुस पटेल, प्रशांत शिंदे, रिपाइंचे (आ) चे रणजीत गायकवाड, सोमनाथ गायकवाड, संदीप अंकुशराव, आप्पासाहेब सिरसाटे, अंकुश पेठे, संग्राम बनसोडे, भीमशक्तीचे मेसा जानराव, मुन्ना घरबुडवे, सुनील माळाळे, विष्णू कांबळे, समाधान सरवदे, विद्यानंद बनसोडे आदी उपस्थित होते.