झाडाचे संगोपन करणार्‍या महिलांना सोन्याची राखी भेट मिळणारराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा उपक्रम

झाडाचे संगोपन करणार्‍या महिलांना सोन्याची राखी भेट मिळणार

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांचा उपक्रम

धाराशिव दि.३ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने शहरातील एमआयडीसीत वृक्षारोपण करून झाडांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. धार्मिक सणाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश यानिमित्ताने देण्यात आला. तसेच प्रत्येक महिला पदाधिकार्‍याने घरासमोर एक झाड लावून वर्षभर संगोपन केल्यास पुढील वर्षीच्या रक्षाबंधनला एक सोन्याची राखी भेट देण्यात येणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे-पाटील यांनी दिले.

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाडांना राखी बांधण्यात आली. तसेच पोलीस बांधवांनाही राख्या बांधण्यात आल्या. यावेळी आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर, राष्ट्रवादीचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, माजी उपनगराध्यक्ष अमित शिंदे, आर्किटेक्ट दशरथ धुमाळ, रोहीत बागल, एपीआय गोरक्षनाथ खरड, हनुमंत म्हेत्रे, ऍड.भाग्यश्री रणखांब, अशोक बांगर, अशोक सोन्ने पाटील, मंजुषा खळदकर, सागर शिंदे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष रंजना भोजने, रागिनी गुळवे, राणी भोसले, नीला राठोड आदी उपस्थित होत्या.

..................................

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी उद्या दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपल्या घरासमोर झाड लावून त्याचा फोटो ९६६५०९०९०९ या व्हाटसअ‍ॅप क्रमांकावर पाठवावा. पुढील वर्षी राखी पौर्णिमेपर्यंत ज्या महिलांनी झाडाचे संगोपन करून वाढवले आहे, अशा महिलांना सोन्याची राखी भेट देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !