तेंडुलकरांच्या विरोधात गणेश मंडळासमोर भीक पेटी आंदोलनाचा प्रहार

तेंडुलकरांच्या विरोधात गणेश मंडळासमोर भीक पेटी आंदोलनाचा प्रहार

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना वारंवार paytm first जुगाराची जाहीरात बंदब करण्याची विनंती केली होती. परंतू अद्याप ही जाहीरात बंद झालेली नाही. या निषेधार्त प्रहार संघटनेच्यावतीने सर्व गणेश मंडळासमोर सचिन तेंडुलकर यांच्यासाठी भीक पेटी ठेऊन जनतेतून भीक मागून त्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी आमचा विरोध तेंडुलकरना नाही. परंतू भारतरत्न व्यक्तीस ही बाब अशोभनीय आहे. एकतर त्यांनी जाहीरात बंद करावी. नाहीतर भारतरत्न परत करावा अशी मागणी कली. जर ही जाहिरात बंद नाही केल्यास आज फक्त धाराशिव येथे केले. उद्या संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्टॉप व गणेश मंडळाजवळ तेंडुलकर भीक पेटी व तेंडुलकर सूचना पेटी लावण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. यावेळी बाळासाहेब कसबे, महेश माळी, बाळासाहेब पाटील, महादेव चोपदार, शशिकांत गायकवाड, विठ्ठल गायकवाड, सुर्यकांत इंगळे, दशरथ भाकरे, सचिन शिंदे आदींसह प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !