शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीच्या २५ टक्के अग्रीम रक्कम - माने

शेतकऱ्यांना मिळणार नुकसानीच्या २५ टक्के अग्रीम रक्कम - माने

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - सध्याच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामांतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान निश्चित करण्याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
        जिल्ह्यातील एकूण ५७ महसूल मंडळापैकी ३६ महसूल मंडळामध्ये ही अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी वेगवेगळे निकष आहेत. त्यामधील २१ दिवसांच्या पावसाच्या खंडाच्या निकषानुसार धाराशिव, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब व परंडा तालुक्यातील एकूण ३६ मंडळाची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये २१ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राजेंद्र माने यांनी तालुका कृषी अधिकारी, शेतकरी व पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांच्यामार्फत ५ टक्के क्षेत्राचे सर्वेक्षण करून अहवाल सादर केला आहे. 
        या नियमानुसार मागील ७ वर्षाच्या सरासरीच्या नजर अंदाजे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होणार असेल तर ही अधिसूचना लागू होते. त्यानुसार २१ दिवसाचा खंड असलेल्या सर्वच ३६ मंडळामध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान होत असल्याचा कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे. या अधिसूचनेनुसार पुढील महिन्याभरात पीक विमा कंपनीला उंबरठा उत्पन्नाच्या आधारे येणाऱ्या नुकसानीच्या २५ टक्के अग्रीम देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
      या व्यतिरिक्त ज्या महसूल मंडळामध्ये २१ दिवसाचा पावसाचा खंड मध्येच फक्त २.५ मिमी पावसामुळे खंडित झाला आहे, अशाही २१ मंडळाची माहिती कृषी विभागाने राज्य शासनाला सादर केली आहे. त्याच्यामध्येही ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असल्याचे आढळून आले असल्याची माहिती शासनाला दिली आहे. दि.१ सप्टेंबर रोजी त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाला पत्र लिहून सध्याच्या पीक परिस्थितीबाबत कळविले आहे.
   सध्या ऑगस्ट महिन्यामध्ये १५४.४ मी.मी. सरासरीच्या तुलनेत फक्त २६.९ मी. मी. ( १७ टक्के) पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सोयाबीन या मुख्य पिकाला सर्वात मोठा फटका बसला आहे. पावसाच्या दिवसाच्या व्याख्येच्या २.५ मी.मी. या नियमानुसार शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. या उद्देशाने जिल्हाधिकारी व कृषी विभागाने यांच्या सह्याने तसा अहवाल शासनास सादर केला आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !