ऋतुजा स्वामीचा आदर्श पतसंस्थेच्यावतीने सत्कार
ऋतुजा स्वामीचा आदर्श पतसंस्थेच्यावतीने सत्कार
धाराशिव दि.१२ (प्रतिनिधी) - पत्रकार प्रकाश स्वामी यांची कन्या ऋतुजा स्वामी हिचा धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएससाठी नंबर लागला आहे. याबद्दल आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या सोळाव्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन जयश्री भुसारे, व्हा. चेअरमन सविता कोरडे, सचिव संजीवनी कपाळे, कुंजवणी स्वामी आदींसह संचालक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.