मराठा आरक्षण लढ्यास राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा पाठींबा

मराठा आरक्षण लढ्यास राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचा पाठींबा

धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण लढ्यास राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरुण निटुरे यांनी जाहीर पाठींबा दिला आहे.
सध्या राज्यात काही प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हे आरक्षण आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी पाठिंबा दिला आहे. तसेच खरे पाहता इतर कोणत्याही समाज घटकांच्या मूळ आरक्षणाला बाधा न पोहोचविता मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होणे अपेक्षित आहे. परंतू तसे न होता सध्या या प्रश्नाचे राजकारण जास्त होत असल्याचे दिसत आहे. तसेच नुकतेच जालना जिल्ह्यातील अंतरवली येथील आंदोलनाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. यामध्ये शांततेतील आंदोलनाला गालबोट लागणारे प्रकार घडले. हा प्रकार लाजिरवाणा आहे. कारण मराठा समाजाने आजपर्यंत लाखोंचे मोर्चे काढले पण कुठेही दगड मारलेला दिसला नाही. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी होऊन संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे सरकारने योग्य तो निर्णय घेवून मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी निटुरे यांनी केली आहे. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !