रस्त्याच्या कामाची स्थगिती उठविण्यासाठी नागरिकांचा महामार्गावर २ तास आंदोलन

रस्त्याच्या कामाची स्थगिती उठविण्यासाठी नागरिकांचा महामार्गावर २ तास आंदोलन 


धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - कळंब तालुक्यातील मंजूर झालेल्या रस्ता कामावरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी शेलगाव (जहागीर) पाटीवर परिसरातील नागरिकांनी २ तास रास्ता रोको आंदोलन दि.१ सप्टेंबर रोजी केले.
रस्त्याच्या कामास २०२२-२३ च्या अर्थसंकल्प व विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२  अंतर्गत कामे मंजूर झालेली आहेत. मात्र या कामांवर शिंदे- फडणवीस-पवार सरकारने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे ही कामे सुरू करता न आल्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे.  या संदर्भामध्ये संबधित ग्रामपंचायतीने निवेदने देऊन रस्ता सुधारण्यासाठी अनेकवेळा मागण्या केल्या आहेत. मात्र शासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे कळंब तालुक्यातील ग्रामस्थांच्यावतीने महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शेलगाव (ज.), सातेफळ, सौंदाना, हळदगाव, वाघोली, शिंगोली, बरमाचीवाडी, तांदुळवाडी, मोहा, खेर्डा, बोर्डा, येडशी आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान लातूर-पुणे मार्ग रोखून धरल्यामुळे रस्त्याचा दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यामुळे या वाहनांमधील प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !