भूकंपात मरण पावलेल्याना सास्तुर येथे सामूहिक श्रद्धांजली
भूकंपात मरण पावलेल्याना सास्तुर येथे सामूहिक श्रद्धांजली
लोहारा दि.३० (प्रतिनिधी) - ३० वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपात सास्तुर व परिसरातील हजारो नागरिकांचा जीव गेला. परिसरातील अनेक गावे उद्ध्वस्त झाली. मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली. त्यानिमित्त सास्तुर येथील स्मृतीस्तंभास सामूहिक श्रद्धांजली दि.३० सप्टेंबर रोजी अर्पण करण्यात आली. यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील, आ.ज्ञानराज चौगुले, सरपंच शितलताई पाटील, नायब तहसिलदार सुजाता हंकारे, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जिपचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, शिवसेना लोहारा प्रमुख जगन्नाथ पाटील, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी, पो.नि.अजित चिंतळे, सतिश गिरी, शिवराज चिनगुंडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.