तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी अभियान पडले पार
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी अभियान पडले पार
धाराशिव दि.१४ (प्रतिनिधी) - जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात युवा मतदार नोंदणी अभियान दि.१३ व १४ सप्टेंबर रोजी घेण्यात आले. युवा मतदार नोंदणी अभियाना अंतर्गत वोटर्स ऍपवर विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी काजी, वडवले व नारायणकर आदी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ऍपवर नोंदणी करण्यासाठी प्रशिक्षण देऊन नोंदणी करून घेतली .यावेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी वोटर कार्ड किती महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ? याची माहिती दिली. विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी डॉ. उषा वडणे, प्रा. प्रमोद तांबारे, प्रा.बालाजी चव्हाण, प्रद्युघ्न वाघमोडे, डिगांबर जाधव यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढे होऊन नोंदणी अभियानास प्रतिसाद दिला. या नोंदणी अभियानांतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभियांत्रिकी व फार्मसी शाखेतील सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला आहे.