जिल्हा कारागृहात हभप झरेगावकर महाराजांचे कीर्तन
जिल्हा कारागृहात हभप झरेगावकर महाराजांचे कीर्तन
धाराशिव दि.९ (प्रतिनिधी) - श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हभप निलेश महाराज झरेगावकर यांच्या प्रासादिक कीर्तनचा कार्यक्रम जिल्हा कारागृहात दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत पार पडला.
या किर्तन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृहाचे वरिष्ठ तुरूंगाधिकारी दिगंबर इगवे, रोटरी क्लबचे संचालक हेमंतजी रामढवे, आशिष जगदाळे, जेष्ठ प्रवचनकार बाबुराव पुजारी महाराज, पवन पाटील, दिपक लोंढे, पोपटराव भोसले, हभप औदुंबर खलाटे यांच्यासह वैराग्याचे महामेरू संतश्रेष्ठ गोरोबाकाकांच्या फडावरील वारकरी, टाळकरी, गायक, वादक उपस्थित होते. कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, महानिरीक्षक डाॅ.जालिंदर सुपेकर, उपमहानिरीक्षक स्वाती साठे, छत्रपती संभाजीनगर मध्य विभागाचे उपमहानिरीक्षक यु.टी. पवार, धाराशिव जिल्हा कारागृहाचे पोलीस अधीक्षक एकनाथ शिंदे, कारागृह व सुधारसेवा विभागाचे सत्यवान हिंगमिरे या सर्वांच्या सहकार्यातून महाराष्ट्रभर हा सोहळा होणार आहे. दरम्यान, दि.१७ जुलैपासून या कीर्तनाची सुरुवात झाली आहे. आजपर्यंत ९ मध्यवर्ती कारागृह तर ३१ जिल्हा कारागृह तर एका महिला कारागृहात व सांगता दिल्ली येथील तिहार जेलमध्ये करण्यात येणार आहे.