देशातील सर्व टोल नाके बंद करण्यासाठी आंदोलन

देशातील सर्व टोल नाके बंद करण्यासाठी आंदोलन

धाराशिव दि‌.१९ (प्रतिनिधी) - जनता सरकार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची राजस्थानमधील नांगल चौधरी टोलनाक्यावर अडवणूक करून हल्ला केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव तालुक्यातील येडशी टोलनाका येथे जनता सरकार मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलन केले. निषेधाचे निवेदन स्विकारण्यास नकार दिल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला. अखेर वरीष्ठ पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर निवेदन स्विकारण्यात आले.

जनता सरकार मोर्चाचे डॉ.देवेंद्र बल्हारा, सुनील शर्मा, रवींद्र भारतीय, वीर सिंह आदींसह पदाधिकारी व कार्यकर्यांना राजस्थानमधील नांगल चौधरी येथील टोलनाक्यावर अडविले. येथे त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ धाराशिव तालुक्यातील येडशी येथील धुळे-सोलापूर महामार्गावरील टोलनाक्यावर नवनाथ दुधाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी निवेदन दिले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. इन्कलाब जिंदाबाद, भारतातील सर्व टोलनाके बंद झाले पाहिजेत, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना नवनाथ यांनी जनता सरकार मोर्चाच्या कार्यकर्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत ते म्हणाले की, डॉ. देवेंद्र बल्हारा हे शेतकरी कर्जमुक्तीसाठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर खाजगी लोकांमार्फत सरकारमधील व्यक्तींनी भ्याड हल्ला घडवून आणला असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील सर्व टोलनाके बंद करण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी जनता सरकार मोर्चाचे पदाधिकारी,  कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !