बालवीर गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६८ गणेश भक्तांचे दान
बालवीर गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिरात ६८ गणेश भक्तांचे दान
परंडा दि.२२ (प्रतिनिधी) - येथील बालवीर गणेश मंडळाच्यावतीने श्री भवानी शंकर मंदिरात दि.२२ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ६८ गणेश भक्तांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन परंडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्धीवाल, माजी उपनगरध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, तुकाराम साळुंके, सुरेशसिंह सद्धीवाल, महाराष्ट्र चॅम्पीयन पै संजय काशीद, मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष शशीकांत जाधव, गणेश राशनकर, कल्याणसागर बँकेचे व्यवस्थापक मनोजसिंह ठाकूर, ऍड पृथ्वीराजसिंह सध्दीवाल, किशोर महाराज बैरागी, प्रविण मिश्रा, प्रवेश मिश्रा, किरण ठाकूर, संकेतसिंह ठाकूर, धीरजसिंह ठाकूर, आदर्शसिंह ठाकूर, बंटी ठाकूर, किरण पांडे, अमर ठाकूर, सागर ठाकूर, मदन दीक्षित आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबीरात ६८ भक्तांनी रक्तदात्यांना सोलापूर येथील मलिकार्जुन ब्लड बँकचे प्रमाणपत्र व जांबुळ वृक्ष रोपवाटीका देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष पावन मिश्रा, उपाध्यक्ष संकेत शुक्ला, खजिनदार सुरजसिंह ठाकूर, सहखजिनदार आयुषसिंह सध्दीवाल, सचिव तुषार पांडे, सहसचिव विश्वजीत ठाकूर, विक्रम मिश्रा, पारस मिश्रा, आकाश मदने, विशाल मदने, अभिषेक मिश्रा, अक्षय मिश्रा, अजय पांडे, राहुल देशमाने, हारी दीक्षित, रक्षित सध्दीवाल, रोहन सुरवसे आदींनी परिश्रम घेतले.