जिल्हास्तर ज्युनिअर ऍथलेटिक्स स्पर्धेचे खामकर यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्हास्तर ज्युनिअर ऍथलेटिक्स स्पर्धेचे खामकर यांच्या हस्ते उद्घाटन
धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - जिल्हा ऍथलेटिक संघटनेच्यावतीने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त जिल्हास्तर ज्युनिअर ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा व निवड चाचणी स्पर्धेचे प्रदीप खामकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा ऍथलेटिक संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप, सचिव योगेश थोरबोले, संचालक राजेश बिलकुले, सचिन पाटील,सुरेंद्र वाले,प्रभाकर काळे सुभाष मारकड,अजिंक्य वराळे, नागेश राजुरे आदी उपस्थित होते.
जिल्हास्तर ज्युनिअर ऍथलेटिक स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळेतील ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. तर खामकर यांनी आरोग्य व जीवनातील खेळा विषयीचे महत्व सांगितले.
या स्पर्धेचे पंच म्हणून मुनीर शेख, रोहित सुरवसे, प्रशांत बोराडे, ऋषिकेश काळे, दीपक ओवाळ, अनिल भोसले, हरी खोटे, शिंगाडे, संतोष राठोड हे काम पाहत आहेत.