जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांच्या नावे बनावट फेसबुक खाते - ओंबासे नागरिकांनी सतर्क रहावे

जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांच्या नावे बनावट फेसबुक खाते - ओंबासे

नागरिकांनी सतर्क रहावे

धाराशिव दि.३० (प्रतिनिधी) - जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांच्या नावाने सोशल मीडीयावर बनावट फेसबुक खाते तयार करून त्यातील मेसेंजरद्वारे त्यांना ओळखणाऱ्या लोकांशी संवाद करुन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे बोलत असल्याचे भासवून ओळखीच्या लोकांना ओंबासे यांचे मिलीटरीमधील मित्राचे फर्निचर सामान स्वस्तात विकणे आहे. तर ते तुम्ही घ्यावे असे सांगून संपर्कासाठी विविध मोबाईल क्रमांक त्यांना देऊन त्या नंबरवरून संपर्क करून सामानाचे फोटो पाठवून सामान घेण्यासाठी, सामान ट्रान्सपोर्ट करण्यासाठी विविध कारणे सांगून कोणीतरी अज्ञात व्यक्ती त्यांच्या नावे लोकांची फसवणूक करीत आहेत.
ओंबासे यांचा फोटो व्हॉट्स अँपवर डीपी  ठेऊन लोकांशी संवाद करुन याच पध्दतीने लोकांची आर्थिक फसवणूक करीत आहे. अशा घटना झाल्याबाबत ओंबासे यांना जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींनी त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याबाबत  कळविले आहे. सायबर गुन्हे पोलीस स्टेशन, धाराशिव येथे त्या अनुषंगाने ओंबासे यांनी त्यांच्याकडे त्यांच्या नावाने काढलेल्या फेक फेसबुक व बनावट व्हाट्स ऍप खाते बंद करण्याची तक्रार दि.२८ सप्टेंबर रोजी नोंदविली आहे. त्यासंबंधी अनुषंगिक कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया चालू आहे.
त्यामुळे डॉ.सचिन ओबासे / Dr. Sachin Ombase / सचिन ओम्बासे / Sachin Ombase असे नाव वापरून सोशल मीडियावर आलेली कोणतीही बनावट खात्यावरुन आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये किंवा डॉ. ओंबासे यांचा फोटो वापरून बनावट व्हॉट्स ऍप नंबरवर कोणतीही प्रतिक्रीया देणे टाळावे. तर त्यावर विश्वास ठेऊ नये, याची नोंद जनतेने घ्यावी व सायबर गुन्ह्याविषयी सुरक्षितता बाळगून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन ओंबासे यांनी केले आहे.
                      

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !