दुध भेसळ प्रकरणी जिल्ह्यातील विविध केंद्रावर कारवाई

दुध भेसळ प्रकरणी जिल्ह्यातील विविध केंद्रावर कारवाई

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) - ग्राहकांना स्वच्छ, ताजे, निर्भेळ, दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे याकरिता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयात दुध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी (समिती सचिव), वजन मापे विभाग यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध दुध डेअरी/दुध संकलन केंद्राच्या तपासण्या करून नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल मिळणे बाकी आहे. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधिताविरुद्ध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित पेढीना तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रूटीची पूर्तता व सुधारणा करण्यास नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील भूम तालुक्यातील मे. हाके ॲग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, धाराशिव तालुक्यातील शेकापूर येथील मे.प्रियदर्शनी मिल्क कलेक्शन ऍण्ड प्रोडक्ट, कळंब तालुक्यातील मराठवाडा ॲग्रो प्रोसेस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, धाराशिव शहरातील एमआयडीसी येथील क्रिमलाईन डेअरी प्रोडक्टस्‍ लिमिटेड तर धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथील मे.दत्तसाई मल्टीस्टेट को-ऑप मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस लिमिटेड तसेच धाराशिव बार्शी नाका जिजाऊ चौक येथील दत्तअमृत दुध डेअरी, तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील गवळण मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस, कळंब तालुक्यातील येरमाळा येथील सुमित खवा सेंटर व स्वामी समर्थ सेंटर, धाराशिव तालुक्यातील पाडोळी (आ) औसा रोड येथील साधना प्रदीप गुंड पाडोळीकर मिल्क ॲण्ड मिल्क प्रोडक्टस व विश्वरुपा फार्मस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, परंडा तालुक्यातील वाकडी येथील श्री दत्त दुध संकलन व चिलींग सेटर, हिंगनगांव (बु) येथील विनायक दुध संकलन व शितकरण केंद्र व गौरी दुध संकलन केंद्र, भूम तालुक्यातील पाथरुड येथील मयुरी खवा व पेढा उत्पादन व विक्री केंद्र, कल्लेश्वर खवा व पेढा उत्पादक विक्री केंद्र, सिध्दनाथ खवा व पेढा उत्पादक विक्री केंद्र आदी केंद्रावर भेटी देऊन नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त शि.बा. कोडगिरे, अन्न सुरक्षा अधिकारी न.त. मुजावर व इतर कर्मचारी यांनी केली आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास  कार्यालयास व टोल फ्री क्रमांक. १८००२२२३६५ यावर तक्रार नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालयाने जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.
                                          

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !