शेतीमालाचा भाव स्वतः ठरविल्यानंतरच शेतकरी समृद्ध होईल - डॉ.बल्हारा

शेतीमालाचा भाव स्वतः ठरविल्यानंतरच शेतकरी समृद्ध होईल - डॉ.बल्हारा

धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - शेतकरी स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवत नाहीत. त्यामुळेच शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकरी जेव्हा कंपन्यांप्रमाणे त्यांच्या मालाचा भाव ठरवेल. तेव्हाच शेतकरी व शेती व्यवसायाला समृद्धी येईल, असे स्पष्ट मत पंजाब येथील डॉ. देवेंद्र बल्हारा यांनी व्यक्त केले.

जनता सरकार मोर्चाच्या वतीने धाराशिव येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी जनता सरकार मोर्चाचे नवनाथ दुधाळ, सुनील शर्मा, संजीव कुमार, सोमदेव आर्य, मोहित कुमार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. बल्हारा म्हणाले की, कर्ज काढणे हा गुन्हा नाही. शेतकरी, व्यापारी, वाहनचालक, मालक यांनी कर्जाचा ताण घेऊ नये. तुमच्यावर बँकेचे कर्ज आहे मात्र तुम्ही फेडू शकत नसाल किंवा बँकेने तुमचे घर, गाडी, शेतावर जप्ती आणली असेल तर आत्महत्या करू नका. कोणत्याही बँकेला तुमचे घर, गाडी, शेती जप्त करता येत नाही, यासाठी तुम्ही कायदा, नियम समजून घेऊन खंबीर होण्याची गरज आहे, असे सांगून त्यांनी कर्ज, रुपयाचा इतिहास, भारताच्या संस्कृतीबाबतही मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण दरम्यान भारतीय रुपयाचा इतिहास, भारतीय शिक्षण, शेतीचे ग्लोबल वार्मिंगमुळे होणारे नुकसान, भारतीय संस्कृतीचा होत चाललेला र्‍हास, भारतीय संविधानात जबरदस्तीने केले जाणारे बदल, बँकांचे मायाजाळ व आरोग्याच्या विविध समजुती, समाज व्यवस्था कशी असावी ? यासह इतर विषयांवर सविस्तर माहिती दिली.

यावेळी सुनील शर्मा, संजीव कुमार, सोमदेव आर्य, मोहित कुमार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

तुळजाभवानी मातेच्या दर्शनाने महाराष्ट्रात सुरुवा
जनता सरकार मोर्चाची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शेतकरी आणि व्यापारी बांधवांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे शेतकरी प्रभावित झाल्याची माहिती दुधाळ यांनी दिली.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !