महिलांमध्ये कर्करोग तपासणीसाठी मोबाईल वैद्यकिय युनिट्स सुरु

धाराशिव दि.४ (जिमाका) - हैद्राबाद मुक्ती संग्राम अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात महिलांमध्ये कर्करोग तपासणी करीता मोबाईल वैद्यकिय युनिट्स हे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आले. यामध्ये ३० वर्षावरील सर्व महिलांची तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब व तीन प्रकारचे कर्करोग यामध्ये तोंडाचा कर्करोग, स्त्रीयामध्ये स्तनाचा कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग याची तपासणी करण्यात येणार आहे.
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते १५ ऑगस्ट रोजी या मोबाईल वैद्यकिय युनिट्सचे उद्घाटन करण्यात आले. सर्व नागरिकांनी या तपासणीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.
जिल्ह्यातील ३० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे ३ लाख महिलांमध्ये कर्करोग आणि इतर असंसर्गजन्य रोग लवकर शोधण्यासाठी एप्रिल २०२३ मध्ये जागतिक आरोग्य दिनी सुरु झालेल्या मिशन आनंदी अंतर्गतही युनिट्स सुरु करण्यात आली आहेत. या उपक्रमा अंतर्गत आता पर्यंत, टिआरआयआयकडून कार्यक्रमात्मक आणि धोरणात्मक मदतीद्वारे, जिल्हा आरोग्य पथकाने ३० वर्ष वरील १,१६,५८८ महिलांची पाच असंसर्गजन्य रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मौखीक, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाची तपासणी केली आहे. अशक्तपणासाठी ८ हजार ७७८ महिला जिल्ह्यातील सार्वजिनिक आरोग्य सुविधांच्या जाळ्याद्वारे संशयित रुग्णांना निदान आणि उपचाराची सुविधा देण्यात आली आहे. अशक्त रुग्णांना पोषण कीट आणि शेवगा रोपांचेही जिल्हा प्रशासना कडून वाटप करण्यात येत आहे.
1 ग्रामीण भागातील महिलांसाठी स्थानिक पातळीवर आरोग्य सेवा देऊन माहिती आणि निदाना बाबत क्षमता यातील अंतर भरुन काढन्यासाठी तसेच पाच कमी किमतीची AI- आधारित वैद्यकिय उपकरणे, तपासणी करीता वेगळी सक्षम टीम आणि पूर्वनियोजित वेळापत्राकाद्वारे पुढिल वर्ष भरात २५००० महिलांच्या दारा पर्यंत पोहोचतील. तसेच NIRAMAI HEALTH Analytix द्वारे विकसित केलेली ही नाविन्य पुर्ण साधने नॉन-इनवेसिव्ह उपकरणांद्वारे महिलांच्या स्तनाची तपासणीची प्रभावीता वाढवतील, जे स्वयंचलित कर्करोग तपासणी साधने म्हणून काम करतात.
जागतिक आरोग्य दिना निमित्त सुरु करण्यात आलेल्या मिशन आनंदी अंतर्गत आरोग्य विभागा मार्फत असंसर्गजन्य रोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि तोंडाचा कर्करोग तसेच स्तनाचा आणि गर्भाशयाच्या ग्रीवासाठी १ लाख १६ हजार ५८८ महिलांची तपासणी केली आहे. तर १ लाख ८ हजार ७७८ महिलांची ऍनिमियासाठी तपासणी करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी महिलांची कर्करोग तपासणी करुन रोग निदान करुन टाळता येण्या जोग्या आणि उपचार करण्यास योग्य तसेच कॅन्सरमुळे होणारा मृत्यू आणि खिशातून होणारा खर्च कमी होईल असे सांगितले. तसेच जिल्हयातील महिलांच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्यापैकी प्रत्येकाला ही उच्चस्तरील निदान साधने उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कटीबध्द आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास व जिल्हा शल्य चिकित्कस डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !