लेडीज क्लबच्यावतीने गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन

लेडीज क्लबच्यावतीने गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन


धाराशिव दि.१९ (प्रतिनिधी) - आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा तथा लेडीज क्लबच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या पुढाकारातून लेडीज क्लबच्यावतीने यावर्षीही गौरी गणपती देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतून जिल्ह्यातील महिलांना आपले कलाविष्कार सादर करण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. यावर्षी १९ सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचं आगमन झाले असून दि.२१ सप्टेंबर रोजी गौरीचे आगमन होईल. जिल्हाभरात गौरी- गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरी गणपतीसाठी भक्त सुंदर अशी आरास तयार करतात. घरोघरी या उत्सवाचा जल्लोष असतो. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यामध्ये लेडीज क्लबचा नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक बक्षिस देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील प्रथम पारितोषक १०,००१ रुपये असून दुसरे पारितोषिक ७००१ रुपये व तिसरे पारितोषिक ५००१ रुपये ठेवण्यात आले आहे. त्यासाठी दि.२२ व २३ सप्टेंबर रोजी परीक्षक हे स्वतः येऊन परीक्षण करतील. त्यानंतरच विजेत्यांची नावे जाहीर होतील. संपूर्ण जिल्ह्यातील महिला या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी केले आहे. तसेच या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नंदा पुनगुडे - ९४२०२००५४९, अस्मिता कांबळे - ९९७५२२७७७४, उषा येरकळ - ८९९९३८५४८४, संगीता भोरे - ९८५०२६२९१६, सुदेशना जाधवर - ९४०४६२३३५२ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !