कदम यांच्या निवासस्थानी जिजाऊ व सावित्री यांचे पूजन
कदम यांच्या निवासस्थानी जिजाऊ व सावित्री यांचे पूजन
धाराशिव दि.२४ (प्रतिनिधी) - राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री आई यांचे प्रतिमेचे यांचे पूजन आशा देवेंद्र कदम यांच्या निवासस्थानी करण्यात आली. जिजाऊ सावित्री पूजनाचे हे १२ वे वर्ष आहे.
कदम परिवार दरवर्षी छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या जिजाऊ व स्त्री शिक्षणाची पहिली शाळा चालवणाऱ्या सावित्रीआई फुले यांनी महिलांना सर्वप्रथम शिक्षणाचा हक्क या देशात मिळवून दिला व ते मिळवण्यासाठी अहोरात्र संघर्ष केला ज्यामुळे आज शिक्षणाबरोबरच सर्वच क्षेत्रात महिला प्रगती करत असताना आपण पाहतो. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवराय यांच्या मनात राष्ट्र प्रेम व स्वराज्याची प्रेरणा निर्माण केली. छत्रपती शिवराय यांच्या जडणघडणीमध्ये जिजाऊ माँसाहेब यांचे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या सोबत बरोबरीचे योगदान आहे. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्री आई यांचे स्मरण या निमित्ताने व्हावे व पुढील पिढीसाठी त्यांची प्रेरणा सतत स्मरणात रहावी या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
यावेळी आशा कदम, शिल्पा कदम, शालन हरभरे, अनिता गुरव, स्नेहल नाईकवाडी, भाग्यश्री अंधारे, राजश्री शिंदे, शैला कटारे, ज्योती कालढोणे, प्रमिला कालढोणे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.