डॉ. श्रीगिरे आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित
डॉ. श्रीगिरे आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित
लोहारा दि.२२ (प्रतिनिधी) - येथील डॉ. रुपाली श्रीगिरे यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. श्रीगिरे यांना वंध्यत्व निवारण क्षेत्रातील कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने, रामजी रेड्डी, महेश इंगळे, टी.व्ही महाराष्ट्र न्यूजचे सर्वेसर्वा धनंजय शिंदे आदी उपस्थित होते. याबद्दल श्रीगिरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.