विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्या आयुष्याला आकार द्यावा - पाटील

विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्या आयुष्याला आकार द्यावा - पाटील

धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - औषध निर्माण सारख्या अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रात आपल्याला नोकरी करण्याची, त्यामध्येच करिअर करण्याची संधी मिळणार आहे. ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे आलेल्या प्रत्येक क्षणाचे संधीत रूपांतर करा. ज्याप्रमाणे कुंभार मातीला आकार देतो. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच आपल्या आयुष्याला आकार याच क्षणी द्यावा, असे प्रतिपादन औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी केले.
धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या औषध निर्माण शास्त्र या विभागामध्ये जागतिक औषध निर्माण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी धाराशिव केमिस्ट ऍण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष धनाजी आनंदे, केमिस्ट मारुती कृपाळ, विशाल हिंगमिरे, लक्ष्मण मुंडे, तेरणा ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब वाघ, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, फार्मसी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. गणेश मते, डीन अकॅडमीक डॉ. डी.डी. दाते आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, अत्यंत महत्त्वाचा असा हा तुमच्या आयुष्यातील टर्न असून तुम्ही या संधीचे रूपांतर सुवर्णसंधीमध्ये केले पाहिजे. तसेच स्वतःच स्वतःचे बेस्ट व्हर्जन बना दुसऱ्याची कधीच तुलना करू नका. दुसऱ्याची तुलना केल्यास नेहमीच नैराश्य आपल्या पदरी पडते असे त्यांनी सांगितले.
तर आनंदे सांगितले की, औषध निर्माण शास्त्र अत्यंत महत्त्वाचे असे क्षेत्र आहे. यामधून रुग्णांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे आपण आपल्या क्षेत्राला न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. तसेच बाळासाहेब वाघ म्हणाले की, तेरणाची अनेक वर्षापासून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याची परंपरा असून फार्मसी क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी लवकरच नावलौकिक मिळविला आहे. तर आमचे विद्यार्थी चांगल्या ठिकाणी, चांगल्या पगारीवर प्लेस होत आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटत असून हेच सातत्य टिकून राहील याचीही आम्हाला खात्री असल्याचे त्यांनी सांगितले. तर प्राचार्य डॉ. माने म्हणाले की, औषध निर्माण शास्त्राची यावेळीची थीम,
फार्मासिस्ट स्ट्रेंथनीग हेल्थ सिस्टीम, अंगदान महादान अशी आहे. त्यामुळे आपण आपल्या क्षेत्रातील बलस्थाने ओळखली पाहिजेत. औषध निर्माण क्षेत्रामध्ये असलेल्या संधी व विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन मागील ४ वर्षात सुरू केलेल्या फार्मसी विभागाने अत्यंत कमी वेळेत नावलौकिक केला असून विद्यार्थी चांगल्या ठिकाणी प्लेस होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच डॉ. मते यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच शिस्तीचे महत्व विशद केले. यावेळी फार्मसीचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !