मोटारसायकल चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद

मोटारसायकल चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद

धाराशिव दि.८ (प्रतिनिधी) - घरासमोर सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या मोटारसायकली चोरून नेण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून मोटरसायकली चोरून नेणाऱ्या लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील एकंबी तांडा येथील एका चोरट्यास पोलिसांनी चोरीच्या मुद्देमालासह रंगेहात पकडून त्याला बेड्या ठोकून जर बंद केले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील शिंगोली येथील बाबासाहेब दिंगाबर वाघमारे यांनी शहर पोलीस ठाण्यात त्याच्या मालकीची अंदाजे १५ हजार रुपये किंमतीची हिरो होंडा स्पेल्डंर प्लस मोटारसायकल एमएच २५ एस १८०९ ही दि. ३० एप्रिल २०२३ रोजी दर्गा परिसर धाराशिव येथे लावलेली असताना अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. या प्रकरणी ५ एप्रिल रोजी शहर पोलीस ठाण्यात गुरनं १४८/२०२३ भा.दं.वि.सं. कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तर धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील शुभम बालाजी परदेशी यांची  अंदाजे ३५ हजार रुपये किंमतीची बजाज सिटी १०० मोटारसायकल क्र एमएच २५ एएक्स ८१३१ ही दि. १ मे रोजी बेंबळी येथील स्वामी समर्थ पेट्रोल पंपा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. या प्रकरणी दि.५ मे रोजी रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात गुरनं १३७/२०२३ भा.दं.वि.सं. कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने या माला विषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत सांजा येथे आले असता त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील अविनाश उर्फ अनिल अशोक चव्हाण याने धाराशिव जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी मोटारसायकल चोरी केल्या असून तो सध्या एकंबी तांडा येथे आहे. वगैरे बाबत मिळालेल्या बातमी वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने नमुद आरोपीस दि. ७ सप्टेंबर रोजी १० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेवून त्याच्याकडून सखोल तपास करुन वर नमुद गुन्ह्यातील २ चोरीच्या मोटारसायकल व बोहर जिल्ह्यातील चोरीची १ मोटारसायकल त्याच्या ताब्यातून जप्त केल्या. ही कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ हुसेन सय्यद, पोलीस नाईक अमोल चव्हाण, अशोक ढगारे, पोलीस अमंलदार बलदेव ठाकूर, रविंद्र आरसेवाड, महिला पोलीस अमंलदार रंजना होळकर, चालक पोलीस अमंलदार नागनाथ गुरव यांच्या पथकाने केली आहे.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !