मुस्लिम समाजाच्या शिक्षणाकडे लक्ष देणे अत्यावश्यक - खानजावेद शेख यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड

मुस्लिम समाजाच्या शिक्षणाकडे लक्ष देणे अत्यावश्यक - खान

जावेद शेख यांची युवक जिल्हाध्यक्षपदी निवड

धाराशिव दि.२६ (प्रतिनिधी) - मुस्लिम समाजाचे मागासलेपणाचे मुख्य कारण हेच आहे. कारण मुस्लिम समाजातील शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे या समाजामध्ये अशिक्षितांचे प्रमाण अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर शिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन शिवसेना (बाळासाहेब) अल्पसंख्याक युवक विभागाचे प्रदेशाध्यक्ष मेहराज खान यांनी दि.२५ सप्टेंबर रोजी केले. दरम्यान, धाराशिव जिल्हाप्रमुख म्हणून जावेद शेख यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना (बाळासाहेब) अल्पसंख्याक युवक विभागाची आढावा बैठक शहरातील जत्रा फंक्शन हॉलमध्ये घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष जावेद शेख, अमोल पाटील, उत्तम शिंदे (परभणी), काकासाहेब खोत, गोपाळ साखरे, सुनील शिंदे, धाराशिव तालुकाप्रमुख समीर शेख, शहरप्रमुख हबीब खान, अब्दुल सत्तार, अन्सार अन्सारी, मुस्ताक शेख सद्दाम कुरेशी, सुरजित जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खान म्हणाले की, मुस्लिम समाजाचा विकास करण्यासाठी आजपर्यंतच्या राजकारण्यांनी केवळ आश्वासने देण्यापलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुस्लिम समाजाच्या विकासाच्या बाबतीत करतो, बघतो, करीन या शब्द प्रयोगाशिवाय मुस्लिम समाजाला दुसरे काहीही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आला माणूस, करा काम हे धोरण अवलंबिले आहे. या धोरणानुसार त्यांनी आजपर्यंत मुस्लिम समाजाच्या विकासासाठी ५ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करुन दिला असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच त्यांच्या पुढाकारातूनच मुंबई येथे २० हजार मुस्लिम समाजाचा मेळावा प्रथमच घेतला असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे मुस्लिम समाजातील युवक व नागरीकांनी आपल्या गावातील, प्रभागातील, शहरातील, तालुक्यातील व जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी काम होईल की नाही अशी शंका न बाळगता बिनधास्तपणे त्या कामासंबंधिचे प्रस्ताव संबंधित यंत्रणेकडे सादर करावेत असे आवाहन त्यांनी केले. जर एखादे काम होण्यास काही अडचण उद्भवली तर याबाबत मी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्यापर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष जावेद शेख महाले की मला काम करण्याची संधी दिली असून जितकी शक्य होतील तितकी कामे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मात्र त्यासाठी थोडंसं पाठबळ वरिष्ठ पातळीवरून व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी सुरजित जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !