तालुकास्तर शालेय ऍथलेटिकस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
तालुकास्तर शालेय ऍथलेटिकस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
धाराशिव दि.१६ (प्रतिनिधी) - तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संयोजन समिती धाराशिवच्यावतीने आयोजित तालुकास्तर शालेय ऍथलेटिकस क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ.पद्मसिंह पाटील पतसंस्थेचे चेअरमन विक्रम पाटील, प्रमुख अथिती म्हणून रवी शितोळे, तालुका संयोजक बिभीषण पाटील, जिल्हा ऍथलेटिकस संघटनेचे सचिव योगेश थोरबोले, जिल्हा ऍथलेटिकस संघटनेचे संचालक दिलीप चव्हाण, पवन वाठवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी महेंद्र अनेक धुरगुडे यांनी खेळाडूंना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तर खेळाडूंनी व्यसनापासून दूर राहून मैदानाशी मैत्री करावी व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवून खेळाडूंनी आपले, जिल्ह्याचे व देशाचे नाव उज्वल करावे असे आवाहन त्यांनी केले. तर विक्रम पाटील यांनी आरोग्य व खेळाचे माणसाच्या जीवनातील महत्व अधोरेखित केले. या स्पर्धेच्या उद्घाटनवेळी धाराशिव ते कन्याकुमारी सायकल प्रवास यशस्वी पूर्ण केल्याबद्दल अमोल माने यांचा सन्मान करण्यात आला.
या स्पर्धेचे पंच म्हणून अजिंक्य वराळे, हरी खोटे, रोहित सुरवसे, संतोष राठोड, किरण शानमे, सुरज ढेरे, प्रभाकर काळे, योगेश माने, योगेश जगदाळे, गणेश मुळे हे काम पाहत आहेत. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी योगिनी साळुंके, प्रणिता जाधवर, देव कांबळे व ऍथलेटिकस कोचिंग सेंटरचे खेळाडू हे परिश्रम घेत आहेत.