महाविद्यालयाने चांगले अभियंते निर्माण करण्याचे काम करावे - डॉ. पाटील
महाविद्यालयाने चांगले अभियंते निर्माण करण्याचे काम करावे - डॉ. पाटील
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - येणाऱ्या काळात कौशल्यपूर्ण व ज्ञान असणाऱ्या अभियंत्यांची गरज भासणार असून चांगले अभियंते निर्माण करण्याचे काम महाविद्यालयाने करावे असे आवाहन धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी दि.१५ सप्टेंबर रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील आळणी गडपाटी येथील डॉ.व्ही.के. पाटील शैक्षणिक संकुलात डॉ.व्ही.के. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग व एस.पी. पॉलिटेक्निक येथे अभियंता दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व नवीन विद्यार्थी स्वागत समारंभ ते बोलत होते. यावेळी शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा.लगदिवे आर.जी , प्रा.माने एल.एम, अभियंता रोहित पंखे, महाविद्यालयाचे प्राचार्य अमर कवडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, चांगले अभियंते तयार होणे ही काळाची गरज आहे. जर चांगले अभियंते तयार झाले तरच राज्याची व देशाची प्रगती होईल. तसेच जगाला दरवर्षी ४ बिलियन अभियंत्याची गरज आहे. परंतू प्रत्यक्षात १.५ बिलियन अभियंते तयार होतात. त्यामुळे रोजगार क्षम उद्योगासाठी अभियत्यांनी तयार होऊन उद्योजगता वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रा. आर. जी. लगदिवे, प्रा. एल.एम. माने यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी सर्व नूतन विद्यार्थ्यांचा पुस्तक देऊन स्वागत तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्राचार्य अमर कवडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डॉ.व्ही.के. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व एस.पी. पॉलिटेक्निकच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.