चिलवडी येथील आरोग्य शिबिरात ५२७ रुग्णांची तपासणी
चिलवडी येथील आरोग्य शिबिरात ५२७ रुग्णांची तपासणी
धाराशिव दि.१५ (प्रतिनिधी) - तालुक्यातील चिलवडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये ५२७ रुग्णांवर विनामूल्य आरोग्य तपासणी व उपचार दि.११ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
धाराशिव तालुक्यातील चिलवडी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी १२० रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे स्वातंत्र्य सैनिक शिवजी जाधव, माजी उपसरपंच अजित सावंत, ग्रापंचे माजी सदस्य दिपक पाटील, सतिश जाधव, अनिल जाधव, नाभिराज चौगुले, प्रदिप जाधव, औदुंबर हरिचंद्र दिंडोळे, यंशवत जाधव, प्रशांत जाधव, अरुण सारफळे, विष्णु तांबे, संतोष राजगुरु, ओम जाधव, शुभम जाधव, रत्नदिप बोराडे इत्यादी उपस्थित होते. तसेच कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.अत्रिनंडन शेट्टी, डॉ. शुभम राठोड, डॉ.जयेश बाहेरकर, डॉ. दामिनी पुरी, डॉ. प्राजक्ता शेटे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे अमीन सय्यद, विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, पोहनेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वंदना गजधणे, हणुमंत गुजर व संतोष सुरवसे, आशा स्वंयसेविका रंजना जाधव, स्वाती दळवी यांनी परिश्रम घेतले.