दुध भेसळ प्रकरणी प्रोमेंथेन स्पेंटा टेक्नॉलॉजीस व गजानन दुध डेअरी केंद्रावर कारवाई

दुध भेसळ प्रकरणी प्रोमेंथेन स्पेंटा टेक्नॉलॉजीस व गजानन दुध डेअरी केंद्रावर कारवाई


धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - ग्राहकांना स्वच्छ, ताजे, निर्भेळ, दुध व दुग्धजन्य पदार्थ मिळावे याकरिता अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयात दुध भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी यांनी जिल्हा दुग्ध विकास अधिकारी (समिती सचिव), वजन मापे विभाग यांच्यासमवेत जिल्ह्यातील विविध दुध डेअरी/दुध संकलन केंद्राच्या तपासण्या करून नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. हे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विश्लेषण अहवाल प्राप्त होताच संबंधिताविरुद्ध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित पेढीना तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रूटीची पूर्तता व सुधारणा करण्यास नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.
      धाराशिव शहर एमआयडीसी येथील प्रोमेंथेन स्पेंटा टेक्नॉलॉजीस प्रा.लि. प्लॉट नंबर सी १८ मधील ५ नमुने व विजय चौक येथील गजानन दुध डेअरी येथील २ नमुने केंद्रावर भेटी देऊन एकूण ७ नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
               ही कारवाई अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सहाय्यक आयुक्त शि.बा.कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी  न.त.मुजावर व इतर कर्मचारी यांनी केली आहे.
                दुध व दुग्धजन्य पदार्थाबाबत काही तक्रार असल्यास  कार्यालयास व टोल फ्री क्रमांक. १८००२२२३६५ यावर तक्रार नोंदवून सहकार्य करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने नागरिकांना केले आहे.
                            

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !