केमवाडी येथील आरोग्य शिबिरात ५१० रुग्णांची तपासणी
केमवाडी येथील आरोग्य शिबिरात ५१० रुग्णांची तपासणी
धाराशिव दि.४ (प्रतिनिधी) - तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांमध्ये विनामूल्य ५१० रुग्णांची आरोग्य तपासणी करून उपचार दि.३ सप्टेंबर रोजी करण्यात आले.
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ९० रुग्णांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्यामुळे त्यांच्यावर तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल, नेरुळ येथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीराचे उद्घाटन सरपंच गजानन कोकरे, संतोष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच प्रशांत फंड, ग्रा.प. सदस्य केशव पाटील, आदम पठाण, अर्जुन खोत आदी उपस्थित होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.सिध्दांत पेठकर, डॉ. लक्ष्मण इंगळे, डॉ.वेदांत रणाळकर, डॉ. शायेब शेख, डॉ. सोरभ इंगळे यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवा केंद्राचे विनोद ओव्हाळ, रवी शिंदे, सचिन व्हटकर, निषीकांत लोकरे, प्रा. आरोग्य केंद्र सावरगाव च्या आशा स्वंयसेविका आशा काशीद, अंजना ताटे यांनी परिश्रम घेतले.