जिल्हा दुध संघाच्या कार्यक्षेत्रात चारा उपलब्ध करून देण्यात यावा

जिल्हा दुध संघाच्या कार्यक्षेत्रात चारा उपलब्ध करून देण्यात यावा


धाराशिव दि.२७ (प्रतिनिधी) - तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघाच्या कार्यक्षेत्रात जनावरांसाठी चारा (मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन देण्यात यावी अशी मागणी तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित धाराशिवच्यावतीने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.२७ सप्टेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा दुध संघ जिल्हास्तरीय संस्थेमार्फत दुध संकलन वितरणाचे कामकाज सुरु आहे. मात्र सध्याच्या नैसर्गीक परिस्थितीमुळे शेतकरी चारा, पाणी व पशुखाद्य अभावी मेटाकुटीला आलेला आहे. तसेच धाराशिव जिल्हा आकांक्षीत असून शेतकरी व कष्टकऱ्यांना दुग्ध उत्पादनाशिवाय दुसरा ठोस पर्याय नाही. मात्र सध्याच्या अवर्षणामुळे जिल्ह्यात चारा पाणी व खुराकाची टंचाई निर्माण झाली आहे.  जिल्हयात सरासरीपेक्षा फारच कमी पाऊस झाल्यामुळे जनावरे जगविण्याचे शेतकऱ्यांपुढे फार मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकरी व शेतमजुरांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या टंचाईचा विचार करुन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तहसील कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना चारा (मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करण्याची व्यवस्था करावी. तसेच सर्व शेतकऱ्यांचे ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करावे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी होऊन त्यांना दिलासा मिळेल. अन्यथा पशुधन झपाट्याने कमी होवून शेतकरी व शेतमजुर कंगाल होईल. हे टाळण्यासाठी त्वरीत चारा ( मुरघास / कुट्टी) उपलब्ध करुन देवून कर्ज माफी द्यावी. तसेच सध्या कार्यरत असलेल्या दुध सहकारी संस्थेमार्फत या योजना राबविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. या निवेदनावर चेअरमन बाळासाहेब शिंदे, संचालक प्रशांत पाटील, अंकुश पाटील, मोहन लोमटे, कांताबाई भुजबळ, रामेश्वर वैद्य, बापूराव शेंडगे, कल्याण घरवुडवे, माजी चेअरमन अशोक तांबारे, संस्था प्रतिनिधी पी.एस. सुरवसे, दत्ता बागल, सुनिक वाकुरे, हमीद पठाण नवनाथ नांगरे, एच.एम. लोमटे, संतोष अतकरे व नागनाथ कोले यांच्या सह्या आहेत.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !