५० कामगारांची हिमोग्लोबिनची तपासणी

५० कामगारांची हिमोग्लोबिनची तपासणी

धाराशिव दि.२ (प्रतिनिधी) - रोटरी क्लब उस्मानाबाद, एम्क्युअर फार्मास्युटिकल्स व गांधी मेडिकल स्टोअर्स यांच्यावतीने एमआयडीसी येथील २  कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ५० कामगार स्त्री पुरूषांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांना गांधी मेडिकल स्टोअर्स यांच्या तर्फे मोफत रक्त वाढीच्या गोळ्या देण्यात आल्या. हा उपक्रम इतर कारखान्यांमधील कामगारांसाठी सुरू राहणार आहे.
हा कार्यक्रम अक्षय मेटल इंडस्ट्री येथे घेण्यात आला.  यावेळी रोटरी क्लबच्या सचिव डॉ मीना श्रीराम जिंतूरकर, कोषाध्यक्ष किरण संजय देशमाने, रो. संजय देशमाने, अक्षय मेटल इंडस्ट्रीच्या स्मिता संतोष शेटे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !