चालकांना माहिती पुस्तके देऊन चालक दिन साजरा
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - १७ सप्टेंबर हा
चालक दिन राज्य उप प्रादेशिक परिवहन वाहतूक अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक महासंघ व हायवे वाहतूक पोलिसांच्यावतीने आटो रिक्षा थांबा, कार, टेम्पो पॉईन्ट, बायपास रोड व येडशी टोल नाका येथे चालकांना माहिती पुस्तिका व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करूण साजरा करण्यात आला. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, सतीश धुंदे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अजित पवार, पवार, पोनि शिंदे, सपोनि राठोड, उस्मानाबाद जिल्हा मोटार मालक संघाचे जिल्हाध्यक्ष मोईनुद्दीन पठाण, जिल्हा उपाध्यक्ष आयुब कुरेशी, जिल्हा सचिव अजिज शेख, जाकेर पठाण, अलताफ सय्यद, हबिब शेख, सलीम पठाण, फेरोज शेख, मदन गोवर्धन, टिल्लू जगधने यांच्यासह पोलिस कर्मचारी, महासंघाचे पदधिकारी व चालक आदी उपस्थित होते.