पाणी व चाऱ्याची सोय, पर्यायीव्यवस्थेसाठी अचुक नियोजन करा - ओंबासे

पाणी व चाऱ्याची सोय, पर्यायी

व्यवस्थेसाठी अचुक नियोजन करा - ओंबासे

 


धाराशिव दि.६ (प्रतिनिधी) - पाणीसाठाच्या स्त्रोतांमध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठा आणि जनावरांसाठी पिण्याच्या पाणी, चारा किती प्रमाणात उपलब्ध आहे, किती दिवस चालणार तसेच हा पाणी आणि चारा  संपल्यानंतर याबाबत पर्यायी व्यवस्था कशा प्रकारे करता येईल, ग्रामीण भागात जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची सोय कशी करावी ? यासाठी अचूक नियोजन करावे असे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दि.६ सप्टेंबर रोजी दिले.          

  जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. यतीन पुजारी उपस्थित आदी होते. जिल्ह्यात पावसाने हजेरी न लावल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे. या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणे व पिण्याच्या पाण्याचे व उच्च जनावरांच्या चाऱ्याचे अधिनियम करणे. या

 पुढे बोलताना ओंबासे म्हणाले की, प्रत्येक गावातील अचूक सर्वेक्षण करुन छोट्या व मोठ्या जनावरांची संख्या मोजावी व त्यांना आवश्यक असलेल्या पाणी व चारा याबाबत नियोजन करावे. तसचे आवश्यक असल्यास विहिरींचे अधिग्रहण सुरु करावे व टँकरने पाणी पुरवठ्यासाठी फिलिंग पाणी भरणा केंद्र दुरुस्त करुन घ्यावे असे त्यांनी सांगितले.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !