डॉ मिटकरी यांच्या हस्ते १८ वर्षांवरील पुरुष मोफत तपासणीचा शुभारंभ

डॉ मिटकरी यांच्या हस्ते १८ वर्षांवरील पुरुष मोफत तपासणीचा शुभारंभ


धाराशिव दि.१८ (प्रतिनिधी) - आयुष्यमान भव: कार्यक्रमांतर्गत १८ वर्षावरील पुरुष आरोगी तपासणीचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला.
धाराशिव शहरातील वैराग रोड येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र.१ येथे हा कार्यक्रम घेण्यात आला.  यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ खान, आपला दवाखानाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ.मिटकरी यांनी पुरुषांच्या तपासणीचे संपूर्ण महत्त्व पटवून दिले. तर रुग्णांची आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करण्यात येईल, अत्यवस्थ रुग्णांना संदर्भीत करताना १०८ रुग्ण वाहिकेचा वापर, मोठ्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास रुग्णांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंगीकृत रुग्णालया मार्फत शस्त्रक्रिया, रुग्णांना विभागातील सर्व आरोग्य संस्था मार्फत संदर्भ सेवा, ई संजीवनी टेलीकन्सलटेशनच्या माध्यमातून रुग्णांना तज्ञांच्या सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे जास्ती जास्त पुरुषांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ मिटकरी यांनी केले.
तसेच अभियान कालावधी दि.१७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर असल्याचे डॉ कोरे यांनी सांगितले. यावेळी वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी कन्सल्टंट डॉ. पल्लवी धनके, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड, सर्व आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
                                                        

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !