शारदीय नवरात्रौत्सवसाठी येत्या १५ दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण करा - ओंबासे

शारदीय नवरात्रौत्सवसाठी येत्या १५ दिवसांमध्ये सर्व कामे पूर्ण करा - ओंबासे

तुळजापुर दि.२५ (प्रतिनिधी) - शारदीय नवरात्रौत्सव १५ दिवसांवर येऊन ठेपले आहे. यासाठी सर्वांनी नेमून दिलेले कामे लवकरात लवकर मार्गी लावावी. तसेच शहरात दिवसेंदिवस मोकाट जनावरांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांबरोबर देवीभक्तांना याचा मोठा त्रास होत आहे. यावर उपाय म्हणून या सर्व मोकाट जनावरांना गोशाळेत रवाना करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी नवरात्रौत्सव तयारी आढावा बैठकीत दि.२५ सप्टेंबर रोजी दिल्या.
शारदीय नवरात्रौत्सव २०२३ ची तयारी आढावा बैठक येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष डॉ ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विश्वस्त डॉ. योगेश खरामटे, विश्वस्त तहसिलदार अरविंद बोळंगे, व्यवस्थापक तहसिलदार सोमनाथ माळी आदी उपस्थित होते. या बैठकीत मागील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या कामाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लातूर सोलापूर बायपासवरील नळदृगकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पुलाच्या बायपासचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. ते येत्या ८ दिवसांत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तर शहरात देवी भाविकांना वाहनांचा कुठलाही अडथळा होऊ नये त्यासाठी शहराबाहेरील चार ठिकाणी वाहनतळ उभारण्याच्या सूचना देऊन त्या ठिकाणी सर्व प्राथमिक सुविधा भाविकांना देण्याच्या सूचना दिल्या. तसेच वाहनतळ व्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी वाहनठेकेदारांनी कर पावती फाडू नये अशी सक्त ताकीद देण्यात आली. जादा बसेसची व्यवस्था नळदुर्ग रोडवरील मोकळ्या जागेवर करण्यात यावी. अवश्य तेवढ्याच बसेस बस स्थानकात सोडण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र परिवहन व कर्नाटक परिवहन महामंडळाने आपसात समन्वय साधून बससेवा सुरळीत ठेवावी. मोकाट जनावरांचा त्रास भाविकांना होऊ नये यासाठी ही सर्व जनावरे सोलापूर येथील गो शाळेत रवाना करावीत. सार्वजनिक बांधकाम विभागांने रस्त्यावरचे खड्डे बुजवून व खडी काढण्याचे काम तात्काळ करावे. ही सर्व कामे येत्या १५ दिवसाच्या आत पूर्ण करावी अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. या बैठकीस मंदिर अधिकारी, नगर परिषद अधिकारी, महावितरण, परिवहन महामंडळ यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !