धुरगुडे यांच्या प्रयत्नामुळे ४ विद्यार्थ्यांच्या पालकांना अपघात सानुग्रह अनुदानाचा लाभ
धुरगुडे यांच्या प्रयत्नामुळे ४ विद्यार्थ्यांच्या पालकांना अपघात सानुग्रह अनुदानाचा लाभ
धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) -
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या प्रयत्नाने शाळेमध्ये शिकत असताना मयत झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनाचा लाभ मिळाला आहे.
चार कुटुंबातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला व त्यादरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष धुरगुडे यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तर त्यांना आर्थिक मदतही केली. तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथील संजय सुवर्णकार यांचा मुलगा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. त्या मुलाला आणि वडील संजय यांना सर्प दंश झाला होता. त्यांच्यावर उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र मुलगा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावला होता. वडील संजय यांची प्रकृती अतिशय गंभीर होती व ते बेशुद्ध अवस्थेमध्ये होते व त्यांना मुलगा मयत झाला हे माहिती नव्हते. त्यावेळी धुरगुडे यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांच्यावर योग्य आणि त्वरित उपचार करावे अशी विनंती केली. मुलगा शिकत असलेल्या शाळेमध्ये सर्व कागदपत्रे दाखल केली. तर सांगवी काटी (कदमवाडी) येथील २ कुटुंब हे पंढरपूरला वारीसाठी जात असताना कुंडी सोलापूर येथे ट्रॅक्टरला अपघात झाल्याने त्यात या कुटुंबातील शिकत असणारी २ मुले अपघातामध्ये मृत्यू पावली. त्यामधील एक मुलगा सातवी व दुसरा आठवीच्या वर्गामध्ये शिकत होता. या दोन्ही कुटुंबाला धुरगुडे यांनी स्वतः मदत केली व कागदपत्रे मुख्याध्यापकांना सोबत घेऊन दाखल केली. तसेच आरळी खुर्द येथील राम मोहिते यांच्या मुलाचे हृदयविकाराचे ऑपरेशन झाले होते व तो मुलगा दोन महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता व घरी आल्यानंतर या मुलाचे निधन झाले. त्याची कागदपत्रे धुरगुडे यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे स्वतः दाखल करुन अनुदान मिळवून दिले. दि.११ सप्टेंबर रोजी सुवर्णकार मोहनेश संजय, शिंदे सुमित सुधाकर, साळुंखे ज्ञानेश्वर दत्तात्रय, ओमकार राम मोहिते यांना विद्यार्थी सानुग्रह अनुदान मिळवून दिले आहे मिळाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, माजी सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र क्षीरसागर, केशेगाव शिंदेवाडीचे उपसरपंच बालाजी शिंदे, तीर्थचे उपसरपंच विनोद जाधव, लिंबराज लोखंडे व अपघातामध्ये मयत झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.