महाआरोग्य शिबिराचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

महाआरोग्य शिबिराचे आरोग्य मंत्री सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

धाराशिव दि.१० (प्रतिनिधी) - वाशी येथील डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, तपोवन वाशी येथे आयुष्यमान भव अभियान अंतर्गत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीव्दारे शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच स्वास्थ्य रथ (मोबाईल मेंडीकल युनिट) चे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत व प्रशांत चेडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवशक्ती साखर कारखाना संचालक केशव सावंत, सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे, सुरज साळुंके, दत्तात्रय मोहिते, माजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, सत्यवान गपाट, शेरकर तर पुणे आरोग्य विभागाचे उपसंचालक परिमंडळ डॉ.राधाकिशन पवार, उपसंचालक परिमंडळ लातूर डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास, डॉ. इस्माईल मुल्ला,  जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.कुलदिप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, डॉ.तानाजी लाकाळ, वैद्यकीय अधिक्षक शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. सुशिल चव्हाण, तहसिलदार नरसिंग जाधव, गट विकास अधिकारी राजगुरु,  मुख्याधिकारी गिरीष पंडित, वैद्यकीय अधिक्षक ग्रामिण रुग्णालय डॉ. दयानंद कवडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ गोवर्धन महिंद्रकर, डॉ. जे.एन. सय्यद तालुका आरोग्य अधिकारी कळंब, डॉ. अमोल शिनगारे तालुका आरोग्य अधिकारी भूम, डॉ. रफीक अन्सारी, नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी आणि सर्व जिल्हा व तालुकास्तरावरील आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नर्संग परिचारीका व आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.

डॉ.तानाजी सावंत यांनी जास्तीत जास्त या आयुष्यमान भव अभियान अंतर्गत शिबीरा दरम्यान रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार तसेच गाव पातळीवरून रुग्णांना येण्या-जाण्यासाठी रुग्ण वाहिकांची मोफत सुविधा  केली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमा दरम्यान प्रशांत चेडे, डॉ.अर्चना भोसले उपसंचालक परिमंडळ लातूर, डॉ. राधाकिशन पवार उपसंचालक परिमंडळ पुणे, डॉ. सतिश हरिदास जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आयुष्यमान भव अभियान अंतर्गत नागरिकांनी दि.१० व ११ सप्टेंबर या २ दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

महा आरोग्य शिबीरा दरम्यान प्रधानमंत्री टी.बी. मुक्त भारत अभियानच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त निक्षय मित्रांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या शिबीरामध्ये लातूर येथील एमआयडीएसआर येथील दंतरोग चिकित्साची रुग्णवाहीका उपलब्ध असून या दंतरोग चिकित्सेचा लाभ रुग्णांनी घेतला. तर दि. १० सप्टेंबर रोजी भैरवनाथ हॉस्पिटल वाशी व दि.११ सप्टेंबर रोजी डॉ.शिंदे मल्टी स्पेशालीटी हॉस्पिटल वाशी येथे विनामुल्य सोनोग्राफीची सोय करण्यात आली असून जनतेने याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन आरोग्य विभागा मार्फत करण्यात आले आहे.  पहिल्या दिवशी महा आरोग्य शिबीरात सुमारे ५२१४ रुग्णांनी लाभ घेतला.



Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !