प्रत्येकांनी समाज माध्यमांवर आलेल्या प्रत्येक माहितीची शहानिशा करावी - डॉ चव्हाण
प्रत्येकांनी समाज माध्यमांवर आलेल्या प्रत्येक माहितीची शहानिशा करावी - डॉ चव्हाण
धाराशिव दि.१३ (प्रतिनिधी) - समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करणारी माहिती समाज माध्यमांद्वारे काही खोडसाळ व उपद्रवी मंडळी सातत्याने पसरविण्याचे काम करीत असतात. अशा पध्दतीची आलेल्या माहितीची शहानिशा करून ती खरी आहे किंवा खोटी आहे ? हे पाहूनच पुढे फॉरवर्ड करावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळ विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दि.१३ सप्टेंबर रोजी केले.
धाराशिव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था कशी आहे ? याचा आढावा घेण्यासाठी डॉ. चव्हाण आले होते. त्यावेळी ते बोलत होत. पुढे बोलताना डॉ. चव्हाण म्हणाले की, बऱ्याच वर्षांनी प्रथमच गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण एकाच दिवशी आलेले आहेत. त्यामुळे हे दोन्ही सण हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत आनंदाने व गुण्यागोविंदाने साजरे करावेत असे आवाहन त्यांनी केले. तर गणेश महोत्सव काळात जिल्ह्यातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळास एक पोलीस दत्तक दत्तक देण्याचा जिल्हा प्रशासन निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्वांचे व्हाट्सअप ग्रुप केले असून काही अडचण आल्यास गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस अधिकारी संपर्क साधावा असे त्यांनी सांगितले. तसेच नागरिकांनी देखील जातीय तेढ निर्माण करणारे व्हाट्सअप स्टेटस, सामाज माध्यमांवर आलेल्या माहितीकडे सपशेल दुर्लक्ष करावे. त्यामुळे समाजामध्ये दंगली घडाव्यात यासाठी काही खोडसाळ मंडळींकडे दुर्लक्ष केल्यास नागरीकांचा समज दृढ होण्यासाठी नक्कीच मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा माहितीमुळे सामाजिक शांतता धोक्यात याची दक्षता घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
................
यावेळी व्हाईस ऑफ मीडियाच्यावतीने डॉ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष रहीम शेख, महानगराध्यक्ष मल्लिकार्जुन सोनवणे, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मते, धाराशिव तालुकाध्यक्ष अमजद सय्यद, कुंदन शिंदे, सुधीर पवार, आकाश नरोटे, अजहर शेख, कलीम मुसा, अजित माळी आदींसह पत्रकार उपस्थित होते.