भारत व परदेशातील उच्च शिक्षण क्षेत्रातील संधीबाबत कार्यशाळा

भारत व परदेशातील उच्च शिक्षण क्षेत्रातील संधीबाबत कार्यशाळा

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) - छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक दि.२४ सप्टेंबर तर महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज संस्थेला १५० वर्षे पूर्ण झाली. तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दल स्थापने संदर्भात घेतलेल्या परिषदेचा दिवस असल्यामुळे भारतातील व विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी याबाबत दि.२४ सप्टेंबर रोजी कार्यशाळा घेण्यात आली.

धाराशिव शहरातील जंबुद्वीप बुद्ध विहारात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेडिकल, इंजिनिअरिंग या क्षेत्रात जाणे म्हणजेच उच्च शिक्षण हा एक मोठा गैरसमज आहे. तर बाहेर देशात किती मोठी संधी शिक्षण क्षेत्रात आहे ? सावित्रीमाई फौंडेशनचे
किशोर भगत‌ यांनी ग्रामीण भागातील बहुजन, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, ज्यांना शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व भेटलेले नाही अशा समुदायातील विद्यार्थी, संशोधक यांना एकॅडमिक सहाय्य, भारतातील नामांकित विद्यापीठ, शैक्षणिक संस्था व परदेशातील विद्यापीठ (लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आदी) ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी मदत करत आहेत. म्हणजे त्या प्रक्रिया समजावून सांगतात व ती संधी कशी मिळविता येईल ? हे सांगतात. या माध्यमातून हा अतिशय चांगला व कधी न ऐकलेला विषय उपस्थितांना समजून घेता आला. त्यामुळे मेडिकल, इंजिनिअरिंग अशा क्षेत्रात जाणे म्हणजेच उच्च शिक्षण हा असलेला गैरसमज दूर झाला. यावेळी भगत म्हणाले की, आपल्या समाजात जे उदासीन वातावरण निर्माण झाले आहे त्या वातावरणात सुद्धा असा प्रतिसाद आशादायक म्हणावा लागेल असे त्यांनी सांगितले. तर पुढील काळात आणखी सकारात्मक पद्धतीने उच्च शिक्षण व बाहेर देशातील शिक्षण क्षेत्रातील संधी यावर काम करता येईल. यासाठी मानसिकता निर्माण नक्कीच विकसित होईल. त्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पृथ्वीराज चिलवंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन दीपक यांनी तर उपस्थितांचे आभार विद्यानंद वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पृथ्वीराज चिलवंत, महादेव एडके, प्राचार्य सुरज नन्नवरे, सम्यक चिलवंत, महेश शिंगाडे यांनी परीश्रम घेतले. 

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !