डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शनला महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद

डिजिटल मल्टिमीडिया प्रदर्शनला महिलांचा उत्सफूर्त प्रतिसा




 

धाराशिव दि.५ (प्रतिनिधी) -  पौष्टिक भरड धान्ये, राष्ट्रीय पोषण महिना आणि केंद्र शासनाने माघील ९ वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने  माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्यावतीने पोषण सप्ताह निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्ये आणि केंद्र शासनाचे ९ वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर मल्टीमीडिया प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

        
 या प्रदर्शनामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील ९ वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह भारतीय भरडधान्याचा इतिहास, ऐतिहासिक नावे, विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे या विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते ६ वाजेर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

           प्रदर्शनाला महिला आर्थिक विकास  महामंडळाच्या बचत गटातील महिलांनी भेट दिल्या. सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी उपस्थित महिलांची प्रदर्शनावर आधारित प्रश्न मंजुषा स्पर्धा घेतली. विजेत्यांना क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण व माविमच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !