अखेर उस्मानाबाद जिल्ह्याचे महसूल दप्तरी धाराशिव नाव लागलेच ! धाराशिव गाव, उप विभाग व जिल्हा असे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दि.१५ सप्टेंबर रोजी निघाले
अखेर उस्मानाबाद जिल्ह्याचे महसूल दप्तरी धाराशिव नाव लागलेच !
धाराशिव गाव, उप विभाग व जिल्हा असे महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दि.१५ सप्टेंबर रोजी निघाले
गतवर्षी महाराष्ट्र राज्य सरकारने औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्याची नावे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव केली होती. त्यावर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, केंद्र सरकारने देखील या नावांना मंजुरी दिली होती. मात्र न्यायालयाने याबाबत आपला निर्णय येईपर्यंत नावांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करु नये असे आदेश राज्य सरकारला दिले होते. मात्र महाराष्ट्र शासन राजपत्र काढून धाराशिव हे नाव कायम केले आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश पांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
महसूल व वन विभाग
मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मुंबई ४०० ०३२, दिनांक १५ सप्टेंबर २०२३.
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६.
अधिसूचना
क्र. प्राफेव- २०२३/प्र.क्र. ३७/ १०. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम एकेचाळीस) चे कलम ४ च्या पोट-कलम (१) चे खंड (सहा) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासन, या प्रस्तावास पूर्व प्रसिद्धी दिल्यानंतर आणि प्रस्तावा संबंधीच्या हरकती व सूचना विचारात घेतल्यानंतर बाहारे सोबतच्या अनुसूचीच्या स्तंभ- १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या महसुली क्षेत्रांच्या नावांमध्ये बदल करीत आहे आणि उक्त अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये त्या प्रत्येकासमोर नमूद केल्याप्रमाणे त्यांना नवीन नावे देत आहे.
.,................
असाधारण भाग चार-ब
वर्ष ९, अंक १२७(४)]
शुक्रवार, सप्टेंबर १५, २०२३ / भाद्रपद २४, शके १९४५
असाधारण क्रमांक ३६५
[पृष्ठे ३, किंमत रुपये १.००
प्राधिकृत प्रकाशन
...............