मुरूम शहरात ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण, पावसासाठी अल्लाहकडे साकडे
मुरूम दि. ३ (प्रतिनिधी) - गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जणमाणसाचे अतोनात हाल होत आहेत. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पशु-पक्ष्यांना चारा-पाणी समस्या निर्माण होत आहे. पाऊस पडावा यासाठी मुरूम व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण अदा करून सर्वत्र पाऊस अशी अल्लाहकडे प्रार्थना केली.
यावेळी बोलताना मौलाना म्हणाले की, माणसाने केलेल्या चुकांचे परिणाम माणसालाच भोगावे लागतात. सृष्टीवर असी कोणती व्यक्ती नाही. ज्याच्याकडून चूक झाली नाही म्हणून, चूक झाली तरी माफी मागणे नाही. त्यामुळे अल्लाह नाराज झाला आहे, म्हणून पाऊस पडत नाही. आपल्या हातून कळतनकळत गुन्हे होतात पण त्याची माफी आपण अल्लाहकडे मागत नाहीत. आपल्या गुन्ह्याची माफी अल्लाहकडे मागावी, नाराज झालेल्या अल्लाहकडे माफी मागत आमच्याकडून झालेल्या चुकांबद्दल माफी दे, या सृष्टी अनेक जीवसृष्टी पावसाची आतुरतेने वाट पहात आहे. आपण आमची प्रार्थना स्वीकारून सृष्टीवर पाऊस पाडावे, अशी मागणी प्रार्थनेद्वारे करण्यात आली. यावेळी मुफ्ती समीउद्दीन, मौलाना शौकत, मुफ्ती असिरुद्दीन, कारी तोफिक, मौलाना सईद, मोलवी खालिद, हाफीज साबीर, रशिद शेख, आयुब मासुलदर, सलीम बागवान, पाशा येणेगुरे, खाजा नुरसे, हनीफ शिखलगार, लालपाशा जमादार, अन्वर नुरसे, सोहेल शेख, बाबा मिर्झा यांच्यासह असंख्य मुस्लिम समाज बांधव व लहान मुलांची उपस्थिती होती.