आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जी.पॅट विषयावर वेबिनार

आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये जी.पॅट विषयावर वेबिनार

धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) - तालुक्यातील गडपाटी येथील डॉ.वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी. औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयामध्ये डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली Empowering students for pharma competitive exam and development of soft skills अंतर्गत जी.पॅट २०२३- २४ या परीक्षेकरिता राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन वेबिनार संपन्न झाला.

या वेबिनारमध्ये मार्गदर्शक म्हणून जी.पॅट डिस्कशन सेंटर प्रायव्हेटचे संचालक डॉ.अभिषेक त्रिपाठी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तर जी.पॅट. परीक्षा पास होण्यासाठी अभ्यास कसा करावा, अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारे घटक, कोणत्या घटकाला किती प्राधान्य द्यावे, कोणत्या घटकावरती किती व कसे प्रश्न विचारले जातात ? या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली. तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी समर्पक अशी उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या शंकाचे निरसन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गाझी शेख हे प्रमुख म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक निशिनंदन शिंदे व सुप्रिया लोंढे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास राष्ट्रीय स्तरावर ८६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !