ईद-ए-मिलादनिमीत्त रक्तदान, रुग्णांस फळांचे वाटप लहान मुली व मुलांनी वेधले लक्ष


ईद-ए-मिलादनिमीत्त रक्तदान, रुग्णांस फळांचे वाटप

लहान मुली व मुलांनी वेधले लक्ष

धाराशिव दि.२९ (प्रतिनिधी) - जश्न-ए-ईद मिलादून नबी अर्थात ईद -ए-मिलाद रक्तदान शिबिर व रुग्णास फळांचे वाटप आदींसह विविध सामाजिक उपक्रम राबवून दि.२९ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली. दरम्यान, लहान मुले व मुली यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ईद-ए-मिलादनिमित्त जुलूस समितीच्यावतीने शहरातील महिला रुग्णालयामधील रुग्णांना फळांचे वाटप दि.२८ सप्टेंबर रोजी करण्यात आले. तर दि.२९ सप्टेंबर रोजी माळी गल्ली, आझाद चौक, दर्गाह रोड जवळील ताज चौक व उमर चौक आदी ४ ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. तर रक्त संकलन रेणुका ब्लड बँक व सह्याद्री ब्लड बँकेच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. तर दर्गाह येथे १०० चादरींचे वाटप करण्यात आले. तसेच दर्गा येथे भाविक व नागरिकांना भोजनदान देण्यात आले. यावेळी जश्न ए समितीचे अध्यक्ष अझहर पठाण, सचिव असलम मुजावर, सदस्य इर्शाद सय्यद, इस्त्याक कुरेशी, नवमान रजवी, अरबाज नदाफ, इर्शाद कुरेशी आदींसह पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर अरब मस्जिदपासून संदल मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, विश्वास शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, पोलीस निरीक्षक उस्मान शेख, सिध्दार्थ बनसोडे, खलील सय्यद, खलिफा कुरेशी, कादर खान, मैनोद्दीन पठाण, धनंजय राऊत, मिलिंद गोवर्धन, मुजीब शेख, प्रशांत पाटील,अग्निवेश शिंदे, महेंद्र धुरगुडे, अभिजीत बागल, अतुल जगताप, शेखर घोडके, कलीम कुरेशी आदींसह मान्यवर मोठ्या उपस्थित होते. ही मिरवणूक काळा मारुती नेहरू चौक मार्गे दर्गाहपर्यंत वाजत गाजत काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये लहान बालकांच्या हातामध्ये पताका तसेच विविध धार्मिक गाणी सादर करण्यात आली. यामध्ये सर्व धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !