नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी शासनाची - पालकमंत्री सावंत

नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी शासनाची -
      पालकमंत्री  सावंत

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) - राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे व सर्वांनी आरोग्यदायी जीवन जगावे हा शासनाचा मानस आहे.म्हणूनच  नागरिकांना मोफत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून तसेच बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार देऊन निरोगी आणि स्वस्थ जीवन जगण्याची दिशा देण्याचा शासनाचा मानस आहे. राज्यातील आरोग्य संस्थेत सर्व वृद्ध व्यक्तींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येईल. औषधांच्या वाढत्या किंमती लक्षात घेता शासकीय दवाखान्यात जेनेरिक मेडिसिनची दुकाने सुरू करण्यात येतील.असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी दि.११ सप्टेंबर रोजी केले.   
वाशी येथे २ दिवसीय आयुष्यमान भव आरोग्य शिबिराच्या सांगता कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
        वाशी येथील डॉ.कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय, तपोवन येथे आयुष्यमान भव अभियान अंतर्गत आयोजित दोन दिवसीय महाआरोग्य शिबिरात १० व ११ सप्टेबर रोजी तब्बल १४८८३ नागरीकांनी आरोग्य तपासणीच लाभ घेतला.तर ६४१ रूग्णांना पुढील  उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. तसेच २०१९  रुग्णांना चष्मे व आयुष्यमान कार्डाचे वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना डॉ सावंत म्हणाले की, राज्याच्या साडेबारा कोटी जनतेच्या आरोग्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्यातील दोन हजार ४१६ शासकीय दवाखान्यामध्ये वृध्दांना मोफत उपचार सुरू करणार येईल. औषधांच्या वाढलेल्या किमती लक्षात घेवून राज्यातील प्रत्येक शासकीय दवाखान्यात ३ हजार जेनेरिक मेडिसीनची दुकाने सुरू करण्यात येतील. तसेच आरोग्य सेवेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा स्वंयसेविकांच्या कुटूंबियांसाठी ५ लाखाचे विमा संरक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
        कर्करोगग्रस्त रूग्णांना यापुढे मोफत उपचाराची सोय करणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलू नये. शासन आरक्षणाबाबत लवकरच निर्णय घेईल. पर्जन्य मापक यंत्रावरील पावसाच्या नोंदी शिथील करून राज्य मंत्रीमंडळामध्ये निर्णय घेवून दुष्काळाबाबत निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
       यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिपचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, प्रशांत चेडे, शिवशक्ती भैरवनाथ साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव सावंत, दत्तात्रय मोहिते,सत्यवान गपाट,सतिष शेरकर, पुणे येथील आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार, लातूरच्या उपसंचालक डॉ.अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. कुलदिप मिटकरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, डॉ. तानाजी लाकाळ, डॉ.सुशिल चव्हाण, तहसीलदार नरसिंग जाधव, गट विकास अधिकारी नामदेव राजगुरू, मुख्यधिकारी गिरीष पंडित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दयानंद कवडे, डॉ गोवर्धन महिंद्रकर, डॉ.जे.एन. सय्यद डॉ.अमोल शिनगारे, डॉ.रफीक अन्सारी,जमा.अमर तानवडे माजी नगराध्यक्ष नितीन चेडे,  नागनाथ नाईकवाडी, शिवहार स्वामी, प्रविण गायकवाड, आन्नासाहेब जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
                                           

Popular posts from this blog

धाराशिव शहरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व लॉज मालक गुरव यांच्यावर गुन्हा दाखल

वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्पा सेंटरवर पोलिसांची धाड धाराशिव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय पाच महिलांची सुटका आरोपी विरुध्द गुन्हा दाखल चारही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्री सावंत यांनी घडविला पुन्हा राजकीय भूकंप !